आर्ची दिसणार आता बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मराठी चित्रपट ‘सैराट’ मुळे फेमस झालेली ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने इतक्या कमी वयात प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. तसेच रिंकू सोशल मीडियावर कार्यक्षम असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तर ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ प्रसारित करीत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत तिने शूटिंगला प्रारंभ केल्याचे म्हटले आहे. तसेच तिने सेटवरील तिचे फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र आता रिंकू राजगुरू ही बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत काम करताना रिंकू दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CM3ZkcCpvWL/?utm_source=ig_embed

तसेच, अभिनेत्री रिंकू राजगुरूने रविवारी (२१ मार्च) मध्ये इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो शेअर करत शूटिंगचा पहिला दिवस असल्याचे सांगितले होते. रिंकू सध्या दिग्दर्शक (Director) सार्थक दासगुप्ता यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्यांच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडीओ प्रसारित करत असतात. या प्रोजेक्टमध्ये रिकुबरोबर अभिनेते अमोल पालेकर हे दिसणार आहेत. अजून या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती मिळालेली नसल्याने मुंबईतील लाइमलाइट स्टुडिओत हे शूटिंग पार पडत आहे. दिग्दर्शक दासगुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रिंकू राजगुरूचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती न्यायालयात बसलेली दिसत आहे.

दरम्यान, त्यांनी इंस्टाग्रामवर अभिनेता अमोल पालेकर यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्यात अमोल पालेकर यांचा पोशाख पाहून ते वकिलांची भूमिका साकारत असल्याचे कळते. रिंकूच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नुकताच तिचा Amazon प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या फिल्ममधे ५ शॉर्ट फिल्म असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या व्यतिरिक्त रिंकूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर फिल्मधे प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू , अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या फिल्मचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी फिल्ममधे दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर (बिग बी)अमिताभ बच्चन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.