Photos : रिंकू राजगुरूनं शेअर केला ‘तो’ फोटो ! लुकपेक्षा कॅप्शनचीच जोरदार चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन – सैराटमधून सर्वांच्या मनात घर करणारी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडीयावर सतत अ‍ॅक्टीव असते. रिंकु (Rinku Rajguru)  सोशल मीडियावरून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकु तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची काही माहिती असेल तर तीही चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. सध्या एका पोस्टमुलं रिंकु पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रिंकूनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. परंतु तिनं दिलेल्या कॅप्शननंच साऱ्यांचं लक्ष वेधलेलं दिसत आहे. सध्या तिच्या फोटोची आणि कॅप्शनचीही सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं कॅज्युअल आऊटफिट घातला आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, मी खरंच माझ्या डोळ्यांनी काळजीपूर्वक ऐकते.

रिंकुचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या लुक आणि सौंदर्यचं कौतुक केलं आहे.

रिंकुच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती छूमंतर या आगामी सिनेमात काम करताना दिसणार आहे. नुकताच तिचा अनपॉज्ड हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे. यात 5 लघुपट आहेत. यातील रॅट ए टॅटमध्ये रिंकु दिसली होती. काही दिवसांपूर्वीच ती हंड्रेड वेब सीरिजमध्ये दिसली आहे. लवकरच ती झुंड या हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे. तिच्या लुकचं पोस्टरही रिलीज झालं आहे. तिनं मेकअप, कागर अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.