‘या’ अभिनेत्याला डेट करू इच्छिते रिंकु राजगुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सैराट मधील आर्ची म्हणजेच रिंकु राजगुरु लवकरच तिच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कागर असं या सिनेमाचं नाव आहे. कागरचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला आहे. त्यातील डायलॉग रसिकांना भावताना दिसत आहेत. सध्या ती कागरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनमध्ये असतानाच तिने तिच्या मनातील एक गोष्ट सांगितली आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला ती डेट करु इच्छिते असा खुलासा तिने केला आहे.

उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमातून घराघरात पोहोचलेला विकी कौशल दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. तरुणींमध्ये विकीची चांगलीच क्रेझ असल्याचं दिसत आहे. त्याच्या फॅन फॉलोविंगमध्येही बरीच वाढ झाली आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत रिंकुचेही नाव आहे. इतकेच नाही तर तिला त्याच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा आहे. एका कार्यक्रमात बोलताना तिने हा खुलासा केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना रिंकुला विचारले की, तुला कोणाला डेट करायला आवडेल रितेश देशमुख की विकी कौशल ? एक क्षणाचाही विलंब न लावता तिने विकी कौशलचं नाव घेतलं. तिने ज्या घाईने त्याचं नाव घेतलं त्यावरून स्पष्ट होतं की ती त्याची किती मोठी चाहती आहे. याच कार्यक्रमात कागरमधील प्रमुख भूमिकेतील असणारा शुभंकरने देखील हजेरी लावली होती.

यावेळी रिंकु आणि शुंभकरने लागलिया गोडी तुझी या गाण्यावर डान्सही केला. यावेळी टीमने चित्रीकरणादरम्यानचे काही किस्सेही सांगितले. रिंकु आपला अनुभव सांगताना म्हणाली की, “कागरसारख्या सिनेमाची मी वाट पाहत होते. यातील माझी भूमिका वेगळी आहे. या सिनेमाचा विषय देखील चांगला आणि काहीतरी वेगळा आहे.” यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनीही सिनेमाविषयी भाष्य केले.