‘असे’ झाले तरच रिषभ पंतला भारतीय संघात संधी

नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला.
मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तीन आठवडे स्पर्धेतून आराम करणार आहे. मात्र न्यूझीलंडबरोबर होणाऱ्या संघाच्या चिंतेत भर पडली असताना आता कर्णधार कोहलीची चिंता कमी होणार आहे. जखमी शिखर धवन यांच्या जागेवर अकरा खेळाडूंच्या यादीत सामिल होण्यासाठी ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानविरुद्ध १६ जूनला होणाऱ्या सामन्याआधी तो इंग्लंडमध्ये दाखल होईल पण त्याला त्या वेळी थेट भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे. जर शिखर धवन पूर्णपणे या स्पर्धेतून बाहेर पडला तरच त्याला ड्रेसिंग रूममध्ये स्थान मिळेल. आज भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आपला तिसरा सामना खेळणार आहे.

दरम्यान, याविषयी अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितले कि, तो भारतीय संघाचा सदस्य नसल्याने त्याला भारतीय संघाबरोबर प्रवास तसेच राहता येणार नाही. तो स्वतंत्रपणे प्रवास करेल. त्याला सामन्याच्या दिवशी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे आता शिखर धवन याच्या दुखापतींकडे सर्वांचे लक्ष लागले असून तो किती दिवसात बरा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिने जगत –

#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’