Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर? दिल्लीचा संघ नव्या कर्णधाराचा करत आहे विचार; ‘हे’ आहेत दोन पर्याय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्याच्यावर देहरादूनच्या येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ पंत (Rishabh Pant) या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र त्याचा भीषण अपघात झाल्यामुळे आयपीएल 2023 मध्ये त्याचे खेळणे जवळजवळ अशक्य मानले जात आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या संघाला ऋषभ पंतच्या जागी दुसरा कर्णधार निवडावा लागणार आहे. यासाठी दिल्लीच्या संघाकडे डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोन चांगले पर्याय आहेत.

 

डेव्हिड वॉर्नरचं उत्कृष्ट नेतृत्व
डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2014 ते 2021 पर्यंत सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा भाग होता. त्यानंतर दिल्लीच्या संघानं आयपीएल 2022 मध्ये डेव्हिड वॉर्नरवर मोठी बोली लावून आपल्या संघात सामावून घेतले होते. यंदादेखील दिल्लीच्या संघाने त्याला कायम ठेवले आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळं त्याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. याच कारणामुळं तो दिल्लीच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

पृथ्वी शॉची कामगिरी
युवा फलंदाज पृथ्वी शॉने अंडर-19 क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाचेदेखील कर्णधारपद सांभाळत आहे. पृथ्वीला कर्णधारपदाचा मोठा अनुभव नसला तरी तो प्रतिभावान आहे. त्यामुळं दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉकडे कर्णधारपद देऊ शकते.

 

दिल्ली कॅपिटल्सचा संघ:
ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल,
सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अ‍ॅनरिक नॉर्खिया, चेतन साकारिया,
कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव,
प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.

 

Web Title :- Rishabh Pant | rishabh pant out of ipl 2023 delhi capitals team looking for a new captain here are two options

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | विरोधकांच्या घोटाळ्यांचा हिशोब नववर्षात चुकता करणार; किरीट सोमय्यांचा ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

Pune Crime News | धकनवडी-बालाजीनगरमध्ये टोळक्याकडून युवकावर खुनी हल्ला, करण पाटील आणि विवेक चोरगेला अटक

Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती