टीम इंडियामधून रिषभ पंतला ‘ब्रेक’ ?, ‘या’ खेळाडूमुळं ‘दबाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विंडीजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत भारताचे महत्वाचे खेळाडू सहभागी होणार असून चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, जसप्रीत बुमराह यांसारखे कसोटी विशेषज्ञ खेळाडू या मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्याचबरोबर या मालिकेआधी भारतीय संघ सराव सामना खेळणार असून या सामन्यात सगळे कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारत आपल्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्यावर देखील टांगती तलवार असून वृद्धिमान सहा कसोटी संघात परत आल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर जर या सामन्यांत त्याने धावा केल्या नाहीत तर त्याची सुट्टी नक्की होणार आहे.

इतिहास रचण्याची संधी

भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून त्याने विंडीजविरुद्व झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत अनुक्रमे २३४ आणि १०६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ हि मालिका देखील जिंकून विंडीजला या मालिकेत देखील वाइटवॉश देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर असे झाले तर भारत पहिल्यांदा विंडीजच्या जमिनीवर तीनही मालिका जिंकण्याचा पराक्रम करेल.

रोहित आणि पंतवर दबाव

वर्ल्डकपमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीचे फळ रोहित शर्मा याला या मालिकेतील समावेशाने मिळाले. त्याचबरोबर एक महिन्याच्या मोठ्या विश्रांतीननंतर बुमराह देखील होणाऱ्या सराव सामन्यात लय मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल. रोहित शर्मा याच्याबरोबरच रिषभ पंत याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात दबाव असणार आहे. वृद्धिमान सहा परत आल्याने त्याच्यावर चांगल्या कामगिरीचा दबाव असणार आहे.

कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार ), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, ऋद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हनुमा विहारी और उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like