वर्ल्डकप 2019 : ‘गब्बर’ शिखर धवनच्या जागेवर ‘या’ खेळाडूची वर्णी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला.

मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तीन आठवडे स्पर्धेतून आराम करणार आहे.

आता भारत आपला पुढील सामना १३ जून रोजी न्यूझीलंडबरोबर तर १६ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर खेळणार आहे. मात्र न्यूझीलंडबरोबर होणाऱ्या संघाच्या चिंतेत भर पडली असताना आता कर्णधार कोहलीची चिंता कमी होणार आहे.

जखमी शिखर धवन यांच्या जागेवर अकरा खेळाडूंच्या यादीत सामिल होण्यासाठी ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

दरम्यान, ऋषभ पंत गेल्या वर्षभरापासून चांगलं प्रदर्शन करत आहे आणि तरीही त्याचा टीममध्ये समावेश न केल्याने विविध चर्चाही रंगल्या होत्या. आता ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश करण्यात आला असून तो बुधवारी इंग्लंडमध्ये पोहोचेल.आयपीयलमध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी करत वर्ल्डकप संघातील समावेशासाठी आपली दावेदारी ठोकली होती.

आरोग्य विषयक वृत्त –

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like