विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी ‘निवृत्‍त’, मुलगा रिषदच्या हाती विप्रोची ‘धूरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी आज निवृत्त होणार आहे. ७४ वर्षांच्या अझिम प्रेमजी यांनी ५३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर कंपनीची धुरा आपल्या मुलाच्या म्हणजे रिषद प्रेमजी याच्या हाती सोपवली आहे. ३१ जुलैपासून रिषद प्रेमजी कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. रिषद प्रेमजी यांना कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

कोण आहेत रिषद प्रेमजी

१) अझीम प्रेमजी यांचे पुत्र असलेले रिषद प्रेमजी हे २००७ साली पहिल्यांदा विप्रोमध्ये रुजू झाले. कंपनीत प्रवेश करण्याआधी ते लंडनमध्ये एका वेब कंपनीत नोकरी करत होते. हॉवर्ड बिजनेस स्कूल मधून त्यांनी एमबीए केले असून जीइ कॅपिटल बरोबर देखील त्यांनी काम केले आहे. २०१४ साली त्यांना वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर अवॉर्ड देखील मिळाला होता. आयटी कंपन्यांची संघटना असलेल्या NASSCOM चे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत.

२) त्याचबरोबर विप्रो कंपनीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांशी देखील ते जुडलेले असतात. त्याचबरोबर कंपनीत काम करताना ते कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त बोनस देण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यामुळे चांगल्या व्यक्तींना कंपनीशी जोडून ठेवण्यात मदत होते.

३) रिषद यांचे वडील अझीम प्रेमजी यांचा जन्म २९ डिसेंबर १९४५ रोजी मुंबईत झाला होता. अझीम प्रेमची यांचे वडील मो. हुसेन हशम प्रेमजी देखील व्यावसायिक होते. त्याचबरोबर त्यांच्या आई देखील उच्चशिक्षित होत्या. सुरुवातीला अझीम यांनी महाराष्ट्रातील अमळनेर येथे वनस्पती तेल, साबण त्याचबरोबर इतर वस्तूंचे उत्पादन सुरु केले होते.

४) प्रेमजी कुटुंब हे मूळचे गुजरातमधील. पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना हेदेखील गुजराती मुस्लिम होते. फाळणीवेळी त्यांनी अझीम यांच्या वडिलांना पाकिस्तानच्या अर्थमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारत आपल्या मातृभूमीतच राहणे पसंद केले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like