अभिनेता ऋषी कपूर दिल्लीच्या रूग्णालयात ‘दाखल’, रणबीर अन् आलियानं घेतली हॉस्पीटलमध्ये ‘धाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इन्फेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी नीतू सिंग, मुलगा रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आहेत. ऋषी कपूर यांनी सांगितले कि, ‘मला एक इन्फेक्शन आहे. ज्याच्यावर उपचार सुरु आहेत. कोणतीही अडचण नाही. मला वाटतं की बहुधा हा प्रदूषणाचा परिणाम आहे. सध्या, ऋषी कपूर रुग्णालयात चांगल्या स्थितीत आहेत.

कर्करोगावर मात :
दरम्यान, ऋषी कपूर कर्करोगाचा उपचार घेत न्यूयॉर्कहून परत आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये कित्येक महिन्यांपासून त्यांच्यावर कर्करोगाचा उपचार झाला आणि अखेर ते बरे होऊन परत आले आहेत. यादरम्यान, नीतू सर्व वेळ त्याच्यासोबत होत्या. रणबीर आणि आलियाने बर्‍याच वेळा न्यूयॉर्कलाही भेट दिली होती. उपचाराच्या वेळीही ऋषी आपल्या चाहत्यांना त्यांचा तब्येतीबाबत अपडेट करत असे.

त्यांच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचे झाल्यास ऋषी कपूर अखेर 2019 मध्ये ‘दि बॉडी आणि ‘झुटा कही का’ या चित्रपटात दिसले होते. याशिवाय राजमा राईस, मुल्क, 102 नॉट आउट, पटेल की पंजाबी शादी , कपूर आणि सन्समध्येही दिसले. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘द इंटर्न’चा समावेश आहे. यात ते दीपिका पादुकोण सोबत काम करत आहे.