अभिनेता ऋषी कपूर यांनी नरेंद्र मोदींकडे केली ‘या’ 3 प्रमुख गोष्टींची ‘डिमांड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने दणदणीत विजय मिळवला. अनेक सेलेब्रेटींनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. त्यातच आणखी एका सेलिब्रटीची भर पडली आहे. ऋषी कपूर यांनी मोदींच अभिनंदन करण्यासोबतच तीन गोष्टींची ट्विटरवरून मागणी केली आहे. विशेष म्हणजे ऋषी कपूर यांनी केलेल्या मागणीला नेटकऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. ऋषी कपूर गेल्या वर्षी कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी न्युयॉर्कमध्ये गेले आहेत.

ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी म्हंटल आहे की , ‘पुन्हा एकदा बहुमताने विजय झालेल्या भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते अरुण जेटली, स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी मनापासून विनंती आहे की त्यांनी देशामध्ये मोफत शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा आणि पेन्शन या तीन महत्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. जर तुम्ही हे आज सुरु कराल तर तर आपण नक्कीच एक दिवस आपलं ध्येय गाठू.’
त्यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अरुण जेटली,स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग केलं आहे.

या ट्विटसोबतच ऋषी कपूर यांनी यांनी आपल्या मागण्या सविस्तरपणे मांडण्यासाठी आणखी चार ट्विट केले आहेत. ऋषी कपूर म्हणाले आहेत की , ‘मी इथलं शिक्षण पाहिलं आणि इथल्या रुग्णालयातील विशेष सोयींना पाहून मी हा विचार करतो की फार कमी लोकांनाच या सुविधा का मिळतात? विशेष म्हणजे इथले अनेक डॉक्टर भारतीय आहेत.’

आता तुम्हाला पुन्हा एकदा पाच वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे माझ्या मागण्यांचा नक्की विचार करा आणि माणुसकीच्या नात्याने एक नवीन आदर्श निर्माण करा. जर मी प्रमाणापेक्षा जास्त काही बोललो असेल तर मला माफ करा. परंतु भारताचा एक नागरिक असल्यामुळे तुम्हाला हे सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं.

ऋषी कपूर कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेले आहेत. ऋषी यांच्यावर सप्टेंबर २०१८ पासून उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संपूर्ण काळात पत्नी नीतू कपूर त्यांच्यासोबत आहे.सध्या त्यांची तब्येत चांगली असली तरी भारतात यायला त्यांना अजून काही महिने लागतील. याचदरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनी न्यूयॉर्कला जाऊन त्यांची भेट घेतली आहे.