ऋषी कपूर कर्करोगमुक्त झाल्याचं वाचून चाहत्यांचा जीव भांड्यात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपुर हे काही महिने कर्करोग च्या आजाराशी झुंज करत होते. ज्यावेळी त्यांना या आजाराचे निदान झाले त्यावेळी उपचारासाठी ते बाहेर ही गेले होते. पण आता त्यांच्या आजाराविषयी एक खुलासा होणार आहे. तो नेमका काय असेल.. हे सविस्तर जाणून घेऊया.

अभिनेते ऋषी कपुर हे काही दिवस कॅन्सर च्या आजारावर उपचार घेत होते. आता त्यांच्या आजाराशी झुज संपणार आहे. कारण ते आता आता या आजारापासून मुक्त झाले आहेत. याचा खुलासा दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केला आहे. ऋषी कपुर हे कॅन्सर मुक्त झाले आहे. अशी पोस्ट राहुल रवैल यांनी शेअर केली आहे. यांनी ऋषी कपुर सोबत फोटो देखिल शेअर केला आहे. ज्यामध्ये ऋषी कपुर आता आजाराशी मुक्त झाले अशी फेसबुक वर पोस्ट केली आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांना खुश करुन टाकणार आहे.

ते सात महिने न्युयार्क मध्ये आजारासाठी उपचार घेत होते. त्यांना कर्करोग झाला होता त्यावेळी त्यांच्या कुटुंबुयांनी या अफवा आहे उडवून लावल्या होत्या. पण आता त्यांच्या आजाराचा त्यांना दिलासा मिळाला आहे. उपचारामुळे त्यांना त्यांच्या आई कृष्णा राज कपुर यांच्या अंत्यसंस्काराला ही जाऊ शकले नाही.

पण आता ते ठिक झाल्याचे कळत आहे. दरम्यानच्या काळात सोनाली बेंद्रे, राकेश रोशन, नफिसा अली यांसारख्या बॉलिवुड कलाकारांनी कर्करोगाच निदान झाले होते. व न्यूरोएंडोक्राईन ट्यूमरशी झुंजणारा अभिनेता इरफान खानही उपचार घेऊन परत आला आहे.