बंद होणार ऋषी कपूर यांचा ‘हा’ शेवटचा सिनेमा ? शुटींगदरम्यान बिघडली होती तब्येत

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांनी गुरूवारी (दि 30 एप्रिल) जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर पूर्ण कपूर कुटुंब आता दु:खात आहे. ऋषी यांचे कुटुंबीय आणि चाहते सतत त्यांच्या काही आठवणी शेअर करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांना सोशलवरून श्रद्दांजली दिली आहे. ऋषी कपूर अनेक आठवणींसोबत एका अधुरा सिनेमाही सोडून गेले आहेत. हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

अभिनेता ऋषी कपूर, जुही चावला, गुफी पेंटल सोबत शर्मादी नमकीन हा सिनेमा करत होते. हितेश भाटीया या सिनेमाचं डायरेक्शन करत होते. हा सिनेमा फरहान अख्तरच्या एक्सल एंटरटेंमेंट बॅनरखाली तयार केला जात होता. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दिल्लीत शुटींगदरम्यान ऋषी कपूर आजारी पडले होते. या रिपोर्टनुसार, शर्माजी नमकीनची शुटींग 2018 मध्ये सुरु झाली होती. परंतु याच काळात ऋषी यांना कॅन्सर असण्याबद्दल माहिती पडलं.

यानंतर लॉकडाऊन असल्यानं सिनेमाची शुटींग थांबली होती. आता तर ऋषी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळं हा सिनेमा बंद होण्याच्या मार्गावर आहे. किंवा हा सिनेमा पुन्हा रिशुट केला जाऊ शकतो. परंतु या प्रकराच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे मात्र मेकर्सच सांगू शकतात. आमच्याकडून याची पुष्टी केली जाऊ शकत नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमा व्यतिरीक्त ऋषी कपूर यांच्याकडे आणखी एक सिनेमा होता ज्याचं नाव होतं इंटर्न. या सिनेमात ते दीपिका पादुकोण सोबत दिसणार होती.