ऋषी कपूर सोडून गेले कुटुंबियांसाठी ‘एवढी’ संपत्ती, वाचून व्हाल थक्क !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता म्हणून ऋषी कपूर यांचे नुकतेच निधन झाले आहे. मात्र त्यांच्या आठवणी आजही जीवंत आहेत. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच चांगला मुलगा, पती, वडील अशा जबाबदार्‍या पार पाडणार्‍या ऋषी यांनी निधनानंतरही त्यांच्या कुटुंबाची साथ सोडली नाही. त्यांनी कुटुंबासाठी मोठ्या संपत्तीची तजवीज करुन ठेवली आहे. त्यामुळे सध्या ऋषी कपूर यांच्या संपत्तीविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

ऋषी कपूर यांची एकूण संपत्ती 40 मिलिअन डॉलर म्हणजेच जवळपास 300 कोटींची आहे. ऋषी कपूर यांच्या कमाईचे अनेक स्त्रोत होते. केवळ चित्रपट हे एकमेव माध्यम नसून त्यांनी अनेक ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केली होती. अभिनयासोबतच ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक होते. याशिवाय ते काही व्यावसायिक उद्योगांमध्येही भागीदार होते. अनेक जाहिराती, ब्रॅण्डसाठीही काम करत होते. ऋषी कपूर यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 20 कोटी ते 3.7 मिलिअन डॉलर इतके होते. त्यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या असून त्यांची किंमत जवळपास 9.7 मिलिअन डॉलर आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीचा विचार केला, तर जवळपास 40 मिलिअन डॉलर आहे. मेरा नाम जोकर, बॉबी या चित्रपटांच्या माध्यमातून ते नावारुपाला आले. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 123 चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार स्वत:च्या नावावर करणार्‍या या अभिनेत्याने ‘द बॉडी’ या चित्रपटात शेवटचा अभिनय केला.