ठरलं …! सीबीआयच्या संचालकपदी ऋषी कुमार शुक्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयच्या संचालक पदावरून अलोक वर्मा यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता 198३ सालच्या बॅचचे IPS अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी नव्या सीबीआय संचालकांच्या नियुक्ती संदर्भात एक विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये पाच जणांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. मात्र ऋषी कुमार शुक्ला यांची नियुक्ती संचालकपदी करण्यात आली आहे.

या नावांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खरगे सहभागी झाले होते. निवडलेल्या पाच नावांवर खरगे समाधानी नव्हते. त्यांचा विरोध डावलत तीन नावे मंत्रिमंडळ समितीकडे पाठवण्यात आली होती. सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा आणि माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील गंभीर आरोप प्रत्यारोपांमुळे या दोघांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. 10 जानेवारीपासून हे पद रिक्त होतं ज्यावर अखेर आज नियुक्ती करण्यात आली आहे.

ही  पाच नावे झाली होती  शार्टलिस्टेड  

१) ऋषी कुमार शुक्ला
२) सीआरपीएफ प्रमुख आर. आर. भटनागर
३)एनएसजी प्रमुख सुदीप लाखताकिया
४)फॉरेन्सिक डायरेक्टर जावेद अहमद
 ५)रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंगचे प्रमुख ए.पी. महेश्वरी