प्रदुषणापासून होणारे आजार टाळण्यासाठी ‘हे’ करा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिवाळा ऋतू तसा सर्वात चांगला मानला जातो. मात्र हिवाळा सुरू (cold Season) झाल्यावरनंतर प्रदूषणात (Pollution)वाढ होते. थंड हवामानामुळे वायु प्रदुषणाचे कण वातावरणात जास्त राहतात. हवेतल्या आर्द्रतेमुळे धुळीचे बारीक कण आणि परागकण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करत असतात. त्यामुळे फुफ्फुसांचे आजार बळावण्याची शक्यता असते. जर रोजच्या आपल्या आहारात व्हिटॅमिन्सचा (Vitamins) भरपूर समावेश केला तर धाप लागणे, जळजळ आणि फुफ्फुसांशी संबंधित सर्व आजारांपासून बचाव होऊ शकतो. याकरिता खाली सांगितलेली तीन व्हिटॅमिनसचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

1) व्हिटॅमिन A
व्हिटॅमिन A हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील पेशींच्या वाढण्यास मदत करते. फुफ्फुसांच्या एमब्रायोनिक विकासाबरोबरच अनेक पेशीसमूह आणि पेशींच्या विकासासाठी व्हिटॅमिन A उपयुक्त आहे. हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं आणि इतर अवयवांच्या नियमित कार्यामध्येही व्हिटॅमिन A महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन A फॅट सोल्यूबल असल्याने शरीरात दीर्घ काळ राहते. डेअरीची उत्पादने, मासे, डाळी, गाजर, ब्रोकोली, खरबूज, फळांची पेय यातून व्हिटॅमिन A मिळण्यास मदत होते.

2) व्हिटॅमिन C
व्हिटॅमिन C चे अनेक फायदे मानवी शरीराला होतात. या व्हिटॅमिन मुळे फुफ्फुसांचं अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. व्हिटॅमिन C मुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेत कोलाजेन तयार होण्यासाठी मदत होते. प्रदूषणामुळे फुफ्फुसात जमा होणाऱ्या धुळीच्या कणांशी आणि विषारी घटकांशी व्हिटॅमिन C लढा देण्यास मदत करते. Allergy, Asthma & Clinical Immunology या जर्नलमध्ये 2014 ला प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार व्हिटॅमिन C फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते आणि व्यायामानंतर दम लागण्याचे प्रमाण निम्म्याने कमी करते. यात अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. फळं, मिरच्या, पेरू, किवी, ब्रोकोली, बेरी यामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते.

3) व्हिटॅमिन D
chronic obstructive pulmonary disease (COPD) एकदम वाढण्याचे प्रमाण व्हिटॅमिन D मुळे कमी होते. व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे घरघर लागणे, ब्राँकायटिस, दमा आणि इतर श्वसनाचे आजार होऊ शकतात. सूर्यप्रकाशातून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D मिळू शकते. ट्युना, सॅलमॉन, सॅरडिन आणि ऑइस्ट्रर तसंच अंड्यातील योक्समध्येही व्हिटॅमिन D मोठ्या प्रमाणात असते.