चाळीशीनंतर वडील होणे ठरू शकते जोखमीचे

पोलीसनामा ऑनलाइन – महिलांमध्ये मेनोपॉजचे एक विशिष्ट वय असते, त्यानंतर त्या मुलास जन्म देऊ शकत नाहीत. परंतु, पुरुष आयुष्यभर मुलांना जन्म देऊ शकतात. यामुळे काही पुरुषांचा उशीरा वडील होण्याकडे कल असतो. सध्याच्या राहणीमानामुळे पस्तीशीनंतर वडील होण्यात अडचणी येत आहेत. पस्तीशी किंवा चाळीशीनंतर वडील झाल्यास त्याचे साइड इफेक्ट बाळामध्ये दिसू शकतात.

प्रत्येकवेळी हृदय धडधडण्यासोबत पुरुष १००० स्पर्मची निर्मिती होत असली तरी सर्व स्पर्म एग फर्टिलाइज करुन बाळाला जन्म देण्यासाठी सक्षम असू शकत नाहीत. हे इजॅक्यूलेशनच्या माध्यमातून बाहेर पडतात किंवा काही वेळेनुसार आपोआप नष्ट होतात. तसेच वय वाढल्यानंतर स्पर्मची गुणवत्ता कमी होते. ४० ते ५० वयात तेवढेच स्पर्म निर्मिती होते जेवढी २५ ते ३० वयात होते. परंतु, आधी सांगितल्याप्रमाणे वाढत्या वयासोबत स्पर्मची क्षमता, गुणवत्ता कमी होते.

वाढत्या वयासोबत स्पर्मचा आकार आणि त्यांची मोबिलिटीही घटते. त्यामुळे फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये अडचण येते. चाळीशीत टेस्टोस्टेरॉन लेव्हल घटू लागल्याने कामेच्छाही कमी होते. वाढत्या वयासोबत स्पर्म म्यूटेशनमुळे होणाऱ्या बाळामध्ये अनेकप्रकारचे जेनेटिक प्रॉब्लेम होऊ शकतात. वडीलांचे वय ४० पेक्षा जास्त असल्यास बाळाला डाऊन सिंड्रोम, ऑटिजम, टाइप १ डायबिटीज आणि स्किट्सफ्रीनियासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.