Coronavirus : घरात ‘या’ पध्दतीनं AC चा वापर केला तर वाढू शकतो ‘कोरोना’चा धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी, लोक जास्तीत जास्त घरात राहत आहेत आणि एसी किंवा कूलरच्या थंड हवेमध्ये त्यांचा वेळ घालवत आहेत. परंतु घरी राहून कोरोना विषाणूचा बचाव होऊ शकतो? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा धोका बाहेरपेक्षा जास्त आपल्या घरात आहे. कारण बंद जागेमध्ये विषाणू सहजतेने पसरतो, विशेषत: ज्या खोल्यांमध्ये व्हेंटिलेशन आणि एअरफ्लो कमी असतो. लिफ्टसारख्या छोट्या आणि बंद ठिकाणी व्हायरस पसरण्याची शक्यता जास्त आहे. अमेरिकेतील वँडरबिल्ट विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक विल्यम शेफनर म्हणाले की, “बंद ठिकाणी आपण अल्पावधीतच विषाणूच्या संपर्कात येऊ शकता.”

सामान्यपणे घराबाहेर विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी होतो. कारण बाहेर नैसर्गिक हवा आणि लोकांपासून दूर राहण्यासाठी पुरेशी जागा असते. संसर्गजन्य रोगांच्या जर्नलच्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यापासून 10 मिनिटातच कोरोना विषाणूचे 90 टक्के कण निष्क्रिय होतात. काही अभ्यासाचा दावा आहे की, सूर्यप्रकाशामुळेही विषाणूचा धोका कमी होतो, परंतु संदर्भात अजून संशोधन सुरु आहे. दरम्यान, डब्ल्यूएचओने तापमानामुळे कोरोना निष्क्रिय होत असल्याच्या बातम्या यापूर्वीच फेटाळल्या आहेत. तसेच आरोग्य तज्ञ शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी बाहेर जाण्याची शिफारस करतात. सद्य परिस्थितीत, आपल्याला केवळ ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी, गर्दीची क्रीडांगणे यासारखी ठिकाणे टाळावी लागतील. जॉगिंग, धावणे आणि सायकल चालवणे हे आरोग्याचे फायदेकारक आणि सुरक्षित मार्ग आहेत.

एसी आणि खराब रूम व्हेंटिलेशनने पसरू शकतो कोरोना
चीनमधील एका रेस्टॉरंटच्या एसीमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या बातमीनंतर अनेकांनी कोरोना विषाणूचा एसीद्वारेही प्रसार होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित करण्यास सुरवात केली. कोणत्याही मर्यादित ठिकाणी एसीद्वारे संक्रमण पसरविण्याचा धोका आहे आणि ते आपले घर देखील असू शकते. शिंका येणे किंवा खोकला किंवा बोलण्यातूनही विषाणूचे कण एसीच्या हवेच्या माध्यमातून घरामध्ये पसरू शकतात. थेंब जमिनीवर पडण्यापूर्वी हवेत असतात. रेस्टॉरंट्स किंवा अशा ठिकाणी एसी संक्रमण अधिक सहजतेने पसरू शकतो. तसेच न्यूयॉर्कची माउंट सिनाई हेल्थ सिस्टमचे म्हणणे आहे कि, “जर घरात कुणाला विषाणूची लागण झाली असेल आणि खोकला किंवा शिंका येताना खबरदारी घेत नसेल तर विषाणूचे छोटे छोटे कण हवेमध्ये पसरतात. एसी असो किंवा पंख असो, खोलीत हवा आणणारी कोणतीही वस्तू या थेंबाचा प्रसार करू शकते.

या गोष्टी ठेवा लक्षात
आपल्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या कारणाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. थोडी सावधगिरी बाळगून आपण घरामध्येही कोरोनाचा धोका कमी करू शकता.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, घराच्या खिडक्या खुल्या ठेवल्यास व्हायरसचे कण बाहेर पडू शकतात. घराच्या पडद्यांना सरकवून ठेवल्याने विषाणूचा प्रसार कमी होतो. तज्ञांच्या मते, सूचनांनुसार आपला होम एअर फिल्टर बदला. काही फिल्टर थेंबासारखे कण काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

संक्रमित व्यक्तीशी आपला संपर्क किती आहे हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, आपण बाहेर फिरायला, किराणा दुकान असो किंवा घरी एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेत असलो तरी सामाजिक अंतर राखण्याचा वारंवार सल्ला दिला जात आहे. लोकांपासून कमीतकमी 6 ते 8 फूट अंतर ठेवा.

या सर्वांखेरीज, वारंवार हात धुणे, तोंड व चेहऱ्याला स्पर्श न करणे, आजूबाजूचा पृष्ठभाग साफ करणे आणि मास्क घालणे यासारख्या नियमांचे पालन करून आपण कोरोना विषाणूंपासून स्वतःचे रक्षण करू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like