‘शॅडोहॅमर’ व्हायरसचा संगणकाला धोका ; १० लाख लोकांना बसला फटका

महाराष्ट्र सायबर पोलिसांचा सुरक्षा अलर्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरातील असूसच्या संगणक आणि लॅपटॉपवर ‘शॅडोहॅमर मालवेअर’ या व्हायरसचा हल्ला झाला आहे. याचा फटका जगभरातील १० लाख लोकांना फटका बसला आहे. या व्हायरसला सामोरे जाण्यासाठी राज्य सायबर पोलिसांनी सुरक्षा अलर्ट जारी केले आहे. तसेच, संगणकाच्या संरक्षणाबद्दल जागरुकता मोहीम राबविले आहे.

असूसच्या संगणकावर जून आणि नोव्हेंबर २०१८ दरम्यान या मालवेअरने हल्ला केला आहे. या सायबर हल्ल्याच्या अभ्यास करणाऱ्या ऑनलाइन सुरक्षा कंपनी कॅस्परस्की लॅब्सच्या माहितीनुसार, असूसच्या लाइव्ह अपडेटला युटिलिटीवर या व्हायरसचा प्रभाव झाला आहे. ही युटिलिटी या संगणकाच्या प्रोग्रॅममध्ये पहिल्यापासूनच होती. बायस, युइएफआय, डा्रयव्हर्स व ॲप्लीकेशन्सला या हल्याचा परिणाम होतो. सॉफ्टवेअरच्या त्रुटीमुळे हे होवू शकले आहे. यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे.

सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन शॅडोहॅमर’ नावाच्या हल्ल्याने असूस लाइव्ह अपडेट युटिलिटीवर प्रभाव टाकला आहे, जो स्वयंचलितपणे त्याच्या प्रणालीसाठी डाउनलोड करतो. एमएसी पत्त्याचा वापर करून या हल्ल्यांनी संगणकांमध्ये प्रोग्रॅम उघडले. ऑपरेशन शॅडोहॅमरच्या हल्ल्यांद्वारे पाठविलेल्या ट्रोजनने एमएसी पत्त्यांमध्ये पूर्व लोड केले होते आणि एमएसी पत्त्याशी जुळणारे उपकरणावर परिणाम झाले होते. अधिकारी म्हणाले की, सुरक्षा तज्ज्ञांनी शॅडोहॅमर ट्रोजन्समध्ये एन्कोड केलेले ६०० एमएसी ॲड्रेस ओळखले आहेत.

सॉफ्टवेअर यंत्रणा अद्ययावत

असूस कंपनीच्या दाव्यानुसार, काही संगणकावरच हा हल्ला झाला आहे. यापासून बचावासाठी सर्व्हर-टू-एंड-युजर सॉफ्टवेअर यंत्रणा अद्ययावत केली आहे. कंपनी हल्ल्यापासून प्रभावित झालेल्या युजरशी संपर्क साधत असून सिक्युरिटी रिक्स निघून गेली आहे की नाही, याची खबरदारी घेत आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाद्वारे सुरक्षा जोखीम हाताळण्यासाठी ट्विटर हँडल @ महासायबर १ द्वारे एक जागृती अभियान राबविले आहे. आपला संगणक या व्हायरसपासून संक्रमित झाला आहे की नाही, हे ओळखता येते. तसेच, त्यापासून बचावाचा तपशीलवार सल्ला देण्यात आला आहे. कॅस्परस्की लॅबच्या सहकार्याने हा एक प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे. सध्या केवळ असूस संगणक यंत्रणेवर हे आक्रमण झाले आहे, असे मानले जाते. असूसच्या संगणकाला या व्हायरसचा विशेष काही परिणाम झाला आहे का हे तपासून घ्यावे.
– बाळसिंग रजपूत, सायबर पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र