Risod police | 3.45 कोटी रुपयांचा 11 क्विंटल गांजा जप्त, 4 जणांना अटक

रिसोड / वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन Risod police | बेकायदा गांजाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना अटक करुन त्यांच्याकडून 3 कोटी 65 लाख रुपये किंमतीचा तब्बल 11 क्विंटल 50 किलो गांजा जप्त (seized) करण्यात आला आहे. ही कारवाई रिसोड पोलीस ठाण्याचे (Risod Police Station) अधिकारी आणि कर्मचारी यांनी हिंगोली-रिसोड रोडवर (Hingoli-Risod Road) सोमवारी (दि.18) केली.

गोटीराम गुरदयाल साबळे (वय-52 रा. कुऱ्हा ता. मोताळ जि. बुलढाणा), सिद्धार्थ भिकाजी गवांदे (रा. निमगाव ता. नांदुरा, जि. बुलढाणा), प्रविण सुपडा चव्हाण
(रा. हनवतखेड ता. मोताळा, जि. बुलढाणा), संदिप सुपडा चव्हाण (रा. हनवतखेड ता. मातोळा, जि. बुलढाणा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रिसोड पोलीस (Risod police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार (Police Inspector Sarang Navalkar)
यांना हिंगोली-रिसोड या मार्गावर एका आयशर ट्रकमधून Eicher truck (एमएच 28 बिबि 0867) मोठ्या प्रमाणात गांजाची वाहूत होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार या मार्गावर सापळा रचण्यात आला.
संशयित आयशर ट्रक अडवून पोलिसांनी झडती घेतली.
त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची पोती आढळून आली.
पोलिसांनी 3 कोटी 45 लाख रुपयांचा गांजा आणि 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 3 कोटी 65 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (SP Bachchan Singh), अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे (Addi SP Gorakh Bhamre),
उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे (Sub-Divisional Police Officer Yashwant Kedge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारंग नवलकार,
पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार(PSI Santosh Nemnar), शिल्पा सुरगडे, पोलीस हवालदार अनिल कातडे, पोलीस नाईक दिपक रंजवे, भागवत कष्टे,
सुनिल इंगळे, गुरुदेव वानखेडे यांच्या पथकान केली.

 

Web Title : Risod police | 11 quintals of cannabis worth Rs 3.45 crore seized, 4 arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Murbad police | बोलेरो पीक गाड्या चोरणारा चोरटा मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात

Small Saving Scheme | पैशांची असेल गरज तर ‘या’ 2 बचत योजनांवर मिळते चांगले कर्ज; जाणून घ्या व्याजदर

Pune News | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची फर्स्ट एड पॉलिक्लिनिकला भेट; लहू बालवडकर यांच्या कामाचे केले कौतुक