रितेशने प्रियांका गांधींना दिल्या शुभेच्छा 

मुंबई : वृत्तसंस्था – प्रियांका गांधी वाड्राची काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. यावर अनेक जणांनी या निर्णयावर टीकाही केल्या तर काहींनी शुभेच्छाही दिल्या. शुभेच्या देणाऱ्यांमध्ये एक नाव आहे बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच. रितेशने प्रियांका गांधी वाड्राला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. रितेश देशमुख हा दिवंगत राजकीय नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.

रितेशने गुरुवारी प्रियांका गांधीचा एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना भेटण्याचे सौभाग्य मला मिळालं होत. त्यांच्या नम्रतेमुळे त्या नेहमी माझ्या लक्षात राहतील. महासचिवपदी त्यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. ही बातमी ऐकून देशभरातील लोक आनंदित आहे, त्यापैकी एक माझी आई सुद्धा आहे, असं ट्विट केले आहे.

प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. यावर भाजपने काँग्रेसवर टीका करत घराणे शाहीचा आरोप केला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.