पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘माऊली’ धावला, ‘रितेश-जेनेलिया’कडून 25 लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सांगली आणि कोल्हापूर येथे पुराने लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा हात पुढे येत आहे. अगदी लहान-सहान गोष्टींपासून सर्व गोष्टी पुरवण्याचा नागरिक प्रयत्न करत आहेत. सर्वबाजूंनी पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून लोकांना अधिक मदतीसाठी आवाहन करत आहेत. तसंच यात मराठी कलाकारही कोल्हापूर आणि सांगलीकरांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र बॉलिवुडमधून कोणाचा मदतीचा हात येताना दिसत नव्हता. त्यामुळे बॉलीवुडच्या कलाकारांवर टीका ही करण्यात आल्या.

बॉलीवूडकर आता कोल्हापूरच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली आहे. २५ लाखांचा चेक त्यांनी मुख्यमंत्री निधीसाठी दिला आहे. त्यामुळे रितेश हा बॉलिवुडमधील पहिला कलाकार असेल ज्याने मदतीचा हात दिला आहे. रितेशनंतर बॉलिवुडमधून मदतीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोल्हापूर सांगलीवर संकट असताना बॉलीवूड कलाकारांचा मदतीचा हात लागलेला दिसला नाही. त्यामुळे जे कलाकार मुंबई महाराष्ट्रात राहून जगावर राज्य करतात आणि त्यांच्या या चाहत्यांमुळे करोडोंनी कमावतात ते मदत करताना दिसत नाहीत. ते अशा वेळेस जातात कुठे? असा प्रश्न सामान्य चाहत्यांकडून केला जात आहे. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावरून बॉलिवूडला चांगलेच फटकारले. लानत है उनपर, जिनके पास दानत नही है…, असं मनसेने म्हटलं आहे. एवढं सगळ झाल्यानंतर बॉलिवुडमधील मंडळी मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like