Riteish Deshmukh And Genelia D’souza | रितेश देशमुखने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयासाठी लिहिली ‘हि’ खास पोस्ट; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Riteish Deshmukh And Genelia D’souza | मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल म्हणून रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांची गणना केली जाते. जवळजवळ 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी या दोघांनी लग्न केले. रितेश-जिनिलीयाच्या लग्नाला आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने त्याची पत्नी जिनिलीयासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Riteish Deshmukh And Genelia D’souza)

 

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जिनिलीयाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला खास कॅप्शन देत रितेशने जिनिलीयासाठी एक पोस्ट लिहिली आहे. “माझा आनंद, हक्काची जागा आणि माझं आयुष्य…बायको, लग्नाच्या 11 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे म्हणत त्याने जिनिलीयाला 11 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश देशमुखने शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Riteish Deshmukh And Genelia D’souza)

रितेश आणि जेनेलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ते वेड या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले तर जेनेलियाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे.
या चित्रपटाने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.

 

Web Title :- Riteish Deshmukh And Genelia D’souza | riteish deshmukh shared special post for wife genelia deshmukh on marriage anniversary

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश