#VIDEO : ‘५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं’, अभिनेता रितेश देशमुखांची मोदींवर जहरी टीका : व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता रितेश देशमुख यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५६ इंचाची छाती या वक्तव्यावर टीका करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते असे वक्तव्य त्यात करण्यात आले आहे.

अभिनेता रितेश देशमुखचा पंतप्रधान मोदींवर टीका करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता रितेश देशमुखचा पंतप्रधान मोदींवर टीका करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Policenama ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 15, 2019

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, विलासराव देशमुख यांचे पुत्र अभिनेते रितेश देशमुख यांचा एक व्हिडीओ काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ५६ इंचाची छाती आहे असे म्हणतात. ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते, हे प्रियंका गांधींचे वाक्य मला आठवते. असे रितेश देशमुख सांगतांना दिसत आहेत.

इतकेच नव्हे तर, तुमच्या खिशात असलेला मोबाईल काँग्रेसने दिला आहे, लातूरमध्ये मोबाईल सेवा साहेबांनी आणली आहे. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाले ही देखील काँग्रेसचीच देण आहे. असे म्हणत काँग्रेस सरकारने केलेले कामही रितेश देशमुख सांगत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसच्या प्रचारार्थ लातूर येथील सभेत रितेश देशमुख बोलत असल्याचे म्हंटले जात आहे.

You might also like