Riteish Deshmukh | वाढदिवशी रितेश देशमुखला बॉलीवूडच्या ‘भाईजान’ कडून खास गिफ्ट…

पोलीसनामा ऑनलाईन – रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलियाच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. रितेश आणि जेनेलिया हे ‘वेड’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा वाढदिवस असून रितेशला बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान याने एका शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

भाईजानने रितेश देशमुख  ला त्याच्या आगामी चित्रपटातील ‘वेड लावलयं’ हे गाणं लाँच करून रितेशला एक अनोखे गिफ्ट दिले आहे. सलमानने या गाण्याचा टीझर शेअर करून कॅप्शन मध्ये लिहीले आहे की, ‘भाऊचा बर्थडे आहे. गिफ्ट तो बनता है. एंजॉय’. सलमान खान याने देखील या गाण्यात काम केले आहे. या गाण्यात रितेश देशमुख सोबतच सलमान खान दिसत आहे.

या सिनेमातून अभिनेत्री जेनेलिया डिसूजा – देशमुख प्रथमच मुख्य भूमिका साकारणार आहे. तिने याअगोदर माऊली या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा रितेशसोबतच्या (Riteish Deshmukh) तिच्या आगामी ‘वेड’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानचा केमियो रोल दिसणार याची चर्चा याअगोदरच रंगली होती. पण आता ‘वेड लावलयं’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्याने या गोष्टीची पुष्टी केली.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने अभिनयाबरोबरच या सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले आहे.
या सिनेमात रितेश जेनेलियासोबत शुभांकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर
हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाची गाणी गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहीली असून ती
अजय – अतुल या जोडीने संगीतबध्द केली आहेत. ‘वेड’ हा सिनेमा ३० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :- Riteish Deshmukh | riteish deshmukh got a special gift from bhaijaan salman khan saying bhauchas birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shah Rukh Khan | ‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; बॉयकॉटबाब केलं होतं भाष्य

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, 42 वर्षीय आरोपी गजाआड; येरवडा परिसरातील घटना