विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त भावुक झाला रितेश ! वडिलांच्या पोषाखासोबत केलं ‘असं’ काही, पाहून येईल डोळ्यात पाणी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रितेश देशमुखचे वडिल आणि महाराष्ट्राचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज 75 वी जयंती आहे. या निमित्तानं रितेशनं खास व्हिडीओ शेअर करत त्यांना बर्थडे विश केलं आहे. रितेश खूपच इमोशनल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

रितेशनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक टिकटॉक व्हिडीओ आहे. ज्यात विलासराव देशमुख यांचा पोषाख आहे. त्यात रितेश त्याचाच हातात टाकून अशी अ‍ॅक्टींग करत आहे जणून तेच त्याला कुरवाळत आहेत आणि बिलगत आहेत. यावेळी रितेश खूपच इमोशनल झाला आहे. बॅकग्राऊंडला एक साँगही सुरू आहे.

व्हिडीओ शेअर करताना रितेशनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये रितेश म्हणतो, “हॅप्पी बर्थडे पप्पा…. मिस यु एव्हरी डे.”

रितेशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. इतकंच नाही तर रितेशचे चाहतेही त्याला असं भावूक पाहून इमोशनल झाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.