रितेश देशमुखनं जेनेलियाला बर्थडेच्या दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुखचा आज ३२ वा वाढदिवस आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून जेनेलिया ने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. सध्या जेनेलिया आपलं पालकत्व सांभाळताना दिसत आहे. दरम्यान, रितेश देशमुखने पत्नी जेनेलियाला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या या पोस्टमध्ये रितेशने जेनेलियाला मिठी मारतानाचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. या पोस्टखाली “तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझे हास्य, माझी क्राईम पार्टनर आहेस. माझी मार्गदर्शक, माझा उत्साह, माझा प्रकाश, माझे जीवन, माझे सर्वकाही तूच आहेत. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासोबत मोठे होणे हे एक आशिर्वादासारखे आहे” असं रितेशने म्हटलं आहे.

दोघांबाबत सांगायचे झाले तर, २००३ साली ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांच्या कारिअरची सुरुवात झाली. तिथेच त्यांची पहिली भेट सुद्धा झाली. त्यावेळी जेनेलियाला वाटायचे रितेश हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने गर्विष्ठ असेल. पण त्याने अ‍ॅटिट्यूड दाखवण्यापूर्वीच तिनेच त्याला अ‍ॅटिट्यूड दाखवण्यास सुरुवात केली. पुढे चित्रपटाच्या सेटवर रितेशचा खरा स्वभाव जेनेलियाला हळू हळू कळाला.

दोघांत मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात केव्हा झाले, हे दोघांना कळले सुद्धा नाही. अखेर २०१२ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. ९ वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यावेळी ते दोघे ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. आता या दोघांना दोन मुलं आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like