काय सांगता ! सिनेमा आवडला नाही म्हणून रितेश देशमुखने एका चाहत्याचे पैसे केले परत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रितेश देशमुखने एका प्रेक्षकाला सिनेमा न आवडल्याने त्याचे पैसे परत केले आहेत. ऐकून चकित झालात ना ! होय रितेशने प्रेक्षकाचे पैसे परत दिले आहेत. रितेश ट्विटरवरील एक पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असणाऱ्या रितेश देशमुखने एका प्रेक्षकाला सिनेमा आवडला नाही म्हणून त्यांचे पैसे सोशलवर पोस्ट शेअर परत केले आहेत. या पोस्टमध्ये रितेशने नोटेचा फोटो पोस्ट केला आहे. एकाला सोशलवर रितेशने मजेशीर रिप्लाय दिला आहे. त्याचीच ही पोस्ट आहे. रितेशची ही पोस्ट व्हायरल होत असून सगळीकडे या पोस्टची चर्चा होताना दिसत आहे.

नेमका प्रकार काय ?
एका व्यक्तीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले आहे की, “बँगिस्तान हा सिनेमा मी पाहिला आहे. मला माझे पैसे परत हवे आहेत.” या पोस्टमध्ये सदर युजरने रितेश देशमुखला टॅग केले आहे. या युजरच्या ट्विटलाच रितेशने मजेशीर रिप्लाय दिला आहे.

या ट्विटला रितेशने उत्तर दिले आहे. रितेशने २०१५ सालच्या चलनातील १००० च्या (आता बंद झालेल्या) नोटेचा फोटो पोस्ट केला आहे. आणि आपल्या ट्विटमधून रिप्लाय करत म्हटले आहे की, “Here you go!आणि हो समोशाचेही पैसे अ‍ॅडजेस्ट करून घे (currency used in 2015)”.

रितेश देशमुख, पुल्कित सम्राट, जॅकलीन फर्नांडिस, आर्या बब्बर स्टारर बँगिस्तान हा सिनेमा २०१५ साली रिलीज झाला होता. रितेश सिडवानी आणि फरहान अख्तर यांनी हा सिनेमा प्रोड्युस केला होता. करण अंशूमन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

 

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like