‘डॉक्टर्स डे’च्या निमित्तानं ‘रितेश-जेनेलिया’नं घेतला आयुष्यातील ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जेनेलियानं सोशलवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

जेनेलियानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात रितेश आणि ती पांढऱ्या कपड्यात दिसत आहे. दोघंही व्हिडीओत आपल्या निर्णयाबद्दल सांगत आहेत. लोकांनाही ते असं करण्याचं आवाहन करत आहेत.

रितेश म्हणतो, “मी आणि जेनेलियानं याबद्दल खूपदा विचार केला. अनेकदा आम्ही चर्चाही केली. परंतु दुर्दैवानं आजवर सांगू शकलो नाही. 1 जुलैला आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की, आम्ही एक पण केला आहे. आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.”

व्हिडीओत जेनेलिया म्हणते, “होय आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला वाटतं की, जीवनाशिवाय मोठी आणि उत्तम भेट दुसरी कोणती असू शकत नाही. तुम्हालाही असं वाटत असेल तर प्लिज पुढे या आणि हा पण करा जसा आम्ही केलाय.”

डॉक्टर्स डेच्या दिवशी घेतला निर्णय

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये जेनेलिया म्हणते, “आज डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like