…आणि रितेश देशमुख भावुक झाला !

मुंबई  : वृत्तसंस्था – कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाला  ‘माऊली’ चित्रपटाच्या टीम ने नुकतीच  हजेरी लावली या कार्यक्रमात टीम ने धमाकेदार एंट्री केली. याच कार्यक्रमात रितेशला वडिलांची आठवण आल्याने तो भावुक झाला. छोट्या सुरवीरांनी “माऊली माऊली” हे अप्रतिम गाणे सादर केले  या कार्यक्रमात  छोट्या सुरवीरांनी एका पेक्षा एक दमदार गाणी चित्रपटाच्या टीम समोर सादर करून त्यांना खुश केले .

मीराने ‘बाबा थांब ना रे’ हे गाण सादर केले ज्यामुळे संपूर्ण टीम सोबत रितेश देशमुखही खूपच भावूक झाला या वेळेस. रितेश देशमुखने त्याच्या वडिलांच्या आठवणी सगळ्यांसोबत शेअर केल्या. तसेच या मंचावर हर्षद नायबल याने माऊली बनून खोट्या विटांची भिंत तोडून जबरदस्त एन्ट्री घेतली आणि काही डायलॉगस देखील म्हटले. तसेच चैतन्यने सादर केलेल्या सर्फ लावून धूवून टाक या गाण्यावर संपूर्ण माऊलीच्या टीमने ठेका धरला. या दरम्यान  जितेंद्र जोशीने त्याची कविता सादर केली.

स्वराली जाधवने नयना ठग लेंगे हे गाणे सादर केले तेव्हा सिध्दार्थने सोफ्यावर उभे राहून गाण्याला दाद दिली. उत्कर्ष, आंशिका आणि सईने देखील उत्तम गाणी सादर केली. मीरा आणि सईने पिंगा, स्वराली आणि उत्कर्षने कबीरा मान जा आणि सक्षम आणि आंशिकाने कोंबडी पळाली ही गाणी सादर केली