रितेश देशमुखनं भांडी घासत हटके अंदाजात अजय देवगणला केलं ‘बर्थ डे विश’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार अजय देवगण आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. सर्व चाहते तसेच काही कलाकारही त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. या सगळ्यात खास शुभेच्छा कोणाच्या ठरल्या असतील तर त्या अभिनेता रितेश देशमुखच्या. कारण रितेश देशमुखनं अजयच्या एका गाण्यावर अतिशय कॉमेडी टिकटॉक व्हिडीओ तयार केला आहे आणि त्याला अनोख्या अंदाजात त्याला बर्थडेच्या शुभेच्छा देल्या आहेत. रितेशची पत्नी आणि बॉलिवूड स्टार जेनेलियादेखील यात दिसत आहे.

रितेशनं काही मिनिटांपूर्वीच त्याच्या ट्विटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की, अजय देवगणच्या मौका मिलेगा तो हम बता देंगे या गाण्यावर अॅक्ट करत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, पत्नी जेनेलिया हातात लाटणं घेऊन त्याच्याकडून भांडी घासून घेत आहे. रितेश मात्र त्या गाण्यावर अॅक्ट करत आहे. त्याचे एक्सप्रेशन आणि कृती खूप मजेदार आहे. व्हिडीओ शेअर करताना रितेश देशमुख म्हणतो, “Happy Birthday Dearest @ajaydevgam. Soem isolation humer with @geneliad one of your song- have a great one my brother.” या ट्विटमध्ये रितेशनं जेनेलिया आणि अजय देवगण असं दोघांनाही टॅग केलं आहे.

रिेतेश हा व्हिडीओ शेअर करून अवघे 10 मिनिटंच झाले असतील परंतु लगेचच हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला. अद्याप रितेशच्या हजारो चाहत्यांनी हा व्हिडीओ लाईक केला आणि शेअर केला आहे. सेकंदाला त्याचे व्ह्युज आणि शेअरींग वाढताना दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like