Ritesh Deshmukh | रितेश देशमुख-जेनिलियाचा बहुचर्चित चित्रपट ‘मिस्टर मम्मी’चा ट्रेलर रिलीज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे बॉलिवूडच्या (Bollywood) लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. त्यांची एकमेकांबरोबरची केमिस्ट्रीही अफलातून आहे. या जोडीचे लाखो चाहते आहेत. या दोघांचे लग्न 2012 मध्ये झाले. लग्नानंतर रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनिलिया देशमुख हे दोघे एकत्र कोणत्या चित्रपटामध्ये दिसले नव्हते. यानंतर या दोघांचा आगामी चित्रपट ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy ) याचा ट्रेलर रिलीज (Trailer Release) झाला आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. अखेर त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

रितेश आणि जेनिलिया 10 वर्षांनी सिल्व्हर स्क्रीनवर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हा ट्रेलर खूपच धमाकेदार आहे. कॉमेडीचा तडका या सिनेमात अनुभवता येणार आहे. जेनिलिया आणि रितेश (Ritesh Deshmukh) दोघंही या सिनेमात प्रेग्नंट असल्याचे ट्रेलरमधून दिसत आहे. यामुळे हा चित्रपट मनोरंजनाचा तडका असणार हे मात्र नक्की. विशेष म्हणजे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या सिनेमात डॉक्टरांच्या भूमिकेत दिसत आहेत. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

 

हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बऱ्याच कालावधीनंतर अभिनेत्री जेनिलिया डिसूझा पुनरागमन करत आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा रितेश आणि जेनिलियाला एकत्र काम करताना पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.
‘मिस्टर मम्मी’ सिनेमाचं दिग्दर्शन शाद अली (Directed Shaad Ali) करणार आहे.
भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

 

 

Web Title :- Ritesh Deshmukh | reitesh and genelia starrer mister mummy trailer relaese

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा