River Improvement Project | ‘नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदी पात्रात भर घालू नका, अन्यथा…’ जलसंपदा खात्याचा पुणे मनपाला स्पष्ट इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नदी सुधार प्रकल्पाच्या (River Improvement Project) नावाखाली नदी पात्रामध्ये भर घालून नदी पात्रातच कृत्रिम जमीन निर्माण केली जात आहे. नद्यांची रुंदीच कमी करण्याचा डाव असल्याने आता नदी सुधार प्रकल्पाबाबत (River Improvement Project) प्रश्न निर्माण झाले आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाने (Water Resources Department) पुणे माहापालिकेला (Pune Municipal Corporation) स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. नदी प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे काहीही बांधकाम केल्यास जलंसपदा विभाग कारवाई करेल. तसेच नदी पात्रात भर घातल्यास भविष्यात येणाऱ्या पुरांना सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असा इशारा मुख्य अभियंत्यांनी (Chief Engineer) गुरुवारी (दि.28) पुणे महापालिकेला दिला आहे.

 

नदी सुधार प्रकल्पाबाबत (River Improvement Project)

 

  • सदर प्रकल्प राबविताना नदी प्रवाहाला अडथळा निर्माण होता कामा नये,
  • नदीची वहन क्षमता कमी होता कामा नये आणि
  • नदीच्या काटछेदात कोणताही बदल करू नये.

 

या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न निर्माण होतात

 

1. मुळातच पुणे हे एक पूरप्रवण महानगर असताना असा पुणेकरांसाठी धोकादायक ठरणारा प्रकल्प का आणि कोणी प्रस्तावित केला?

 

2. गेली काही वर्षे या प्रकल्पावर चर्चा चालू असताना, अनेक पर्यावरणवाद्यांकडून विरोध होत असताना टेंडर नोटीस निघेपर्यंत मनपातील संबंधित अभियंते निद्रावस्थेत होते का? का, त्यांच्यावर काही दबाव होता? असल्यास कुणाचा?

 

3. या प्रकल्पासाठी 4727 कोटी रुपये मान्य करताना पुण्यातील एकाही नगरसेवकाला आवश्यक माहिती घेऊन सर्वसाधारण सभेत काहीही चर्चा करण्याची गरज का वाटली नाही?

 

4. या प्रकल्पाला मिळालेल्या अत्यंत वादग्रस्त पर्यावरणीय मंजुरीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना मनपाला हा प्रकल्प पुढे रेटण्याची घाई का आहे?

 

5. पुण्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जलसंपदा खात्याने या प्रकल्पावर अनेक वेळा आक्षेप घेतलेले असतानाही मनपाने जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा का केला?

 

6. नागरिकांचेच हजारो कोटी रुपये खर्च करून नागरिकांच्याच जिवाला धोका निर्माण करणारे प्रकल्प प्रस्तावित करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ते मान्य करणाऱ्या नगरसेवकांना जबाबदार समजावे का? (River Improvement Project)

 

संबंधितांकडून या प्रश्नांची खुलासेवार आणि तर्कशुद्ध उत्तरे त्वरित मिळावीत अशी मागणी सारंग यादवाडकर (Sarang Yadwadkar), विवेक वेलणकर – सजग नागरिक मंच (Vivek Velankar – Sajag Nagrik Manch), विजय कुंभार – सुराज्य संघर्ष समिती (Vijay Kumbhar – Surajya Sangharsh Samiti), सुजित पटवर्धन – परिसर (Sujit Patwardhan – Parisar), नरेंद्र चुग – जल बिरादरी (Narendra Chugh – Jal Biradari), के जे जॉय – SOPECOM(K J Joy – SOPECOM), शैलेंद्र पटेल – जलदेवता सेवा अभियान (Shailendra Patel – Jaldevta Seva Abhiyan), पुष्कर कुलकर्णी – पाषाण क्षेत्र सभा (Pushkar Kulkarni – Pashan Area Sabha), दीपक श्रोते – वसुंधरा स्वच्छता अभियान (Deepak Shrote – Vasundhara Swachhata Abhiyan), सुषमा दाते – डेक्कन जिमखाना परीसर समिती (Sushma Date – Deccan Gymkhana Parisar Samiti), रवींद्र सिन्हा – मिशन भूजल (Ravindra Sinha – Mission Groundwater)

वैशाली पाटकर – औंध विकास मंडळ (Vaishali Patkar – Aundh Vikas Mandal), कनीज सुखरानी – असोसिएशन ऑफ नगर रोड सिटिझन्स फोरम (Qaneez Sukhrani – Association of Nagar Road Citizens Forum), शैलजा देशपांडे – जीवननदी (Shailaja Deshpande – Jeevitnadi), प्रवीणकुमार आनंद – आनंदवन मित्रमंडळ (Praveen Kumar Anand – Anandvan Mitramandal), आशुतोष प्रधान – पुनर्भरण फाउंडेशन (Ashutosh Pradhan – Punarbharan Foundation), सुहास पटवर्धन – पुणे जि. कोप. Hsg. आणि अॅप्स. फेड. (Suhas Patwardhan – Pune Dist. Coop. Hsg. and Appts. Fed.), हेमा सी मदभुशी – योद्धा माता (Hema C Madabhushi – Warrior Moms), तन्मयी शिंदे – फ्रायडेस फॉर फ्युचर, पुणे (Tanmayi Shinde – Fridays For Future, Pune) यांनी केली आहे. (River Improvement Project)

 

Web Title : River Improvement Project | ‘Don’t add to the river basin under the name of river improvement project, otherwise …’ Water Resources Department pune corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Edelgive Hurun India Philanthropy | यंदा विप्रोच्या अजीम प्रेमजींनी केलं दररोज 27 कोटीचं दान; जाणून घ्या भारतातील टॉपचे 5 दानशूर व्यक्ती कोण?

Diet tips | अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर अतिशय कमी प्रमाणात खा ‘हे’ 10 पदार्थ; जाणून घ्या

Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज प्रकरणानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ?