SSR Case : सुशांतच्या पैशांनी रिया करायची भावाचा खर्च, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पटना एसआयटीने सुशांतसिंह राजपूत कर्मचार्‍यांच्या केलेल्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. दरम्यान, माहितीनुसार रियाचा भाऊ शाेविक सुशांतच्या कंपनीत पार्टनर आहे. पण आता हे सुद्धा उघड झाले आहे की, रिया तिच्या भावाचे सर्व पैसे सुशांतच्या खात्यातून काढलेल्या पैशातून खर्च करत असे, असे सुशांतच्या घरी काम करणाऱ्यांनी सांगितले. माहितीनुसार सुशांत सिंह त्याच्या खात्यातून सतत निघणाऱ्या पैशांमुळे चिंतीत होता. त्याच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचे माहित होते. एक दिवस रिया चक्रवर्ती सुशांतच्या समोर बसली होती. या दरम्यान, त्याने आपल्या खात्यातून निघणाऱ्या पैशाचा उल्लेख केला. सुशांत रियाला थेट न बोलता कुकला म्हंटले कि तुम्ही लोक खूप पैसे खर्च करत आहात, तो कमी करा. रियाने हे सर्व ऐकले. प्रश्न असा आहे की सर्व काही माहित असूनही सुशांतने रियाशी याबद्दल थेट का बोलले नाही? एवढं काय होतं की त्याला थेट रियाला काहीच बोलता येत नव्हतं. नोकरांशी बोलण्याच्या बहाण्याने सुशांत आपले शब्द रियापर्यंत पोहोचवत असे.

अशोक कुक आणि नीरज यांचे विधान सर्वात महत्त्वाचे
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण भागात कूक अशोक आणि सुशांतचा कर्मचारी नीरज यांची विधाने खूप महत्त्वाची आहेत. दोघांनी रिया चक्रवर्तीचा कारनामा उघडकीस आणला आहे. सुशांतच्या या दोन कर्मचार्‍यांच्या डोळ्यासमोर बरेच काही घडले, ज्यांचा उल्लेख त्यांनी एसआयटीला केला होता.

रिया सुशांतला औषधांचा ओव्हरडोज द्यायची
रिया चक्रवर्ती सुशांतसिंह राजपूतला औषधांचा ओव्हरडोज द्यायची. सुशांतचे मानसिक संतुलन बिघडावे, त्याची विचार करण्याची आणि समजण्याची कमी व्हावी , म्हणून जाणीवपूर्वक त्याला ड्रग्सचा जास्त प्रमाणात डोस दिला जायचा. पटणा पोलिसांच्या एसआयटी तपासणीत अशी अनेक रहस्ये समोर आली आहेत. सुशांतचा मेंदू काम करू नये आणि त्याच्या पैशाचा वापर करता यावा म्हणून रिया हे हेतुपुरस्सर करत होती का असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. रिया चक्रवर्तीने स्वत: सुशांतचे बँक स्टेटमेंट समोर आणले होते. रिया सुशांतच्या पैशातून तिच्या भावाचे पैसेही खर्च करायची.

दिशाचा तपशील मागितला असता मुंबई पोलिसांची उडाली खळबळ
सुशांत आणि दिशा सलियान यांच्या मृत्यूच्या संबंधाचा तपास जेव्हा पटना पोलिसांच्या एसआयटीने सुरू केला, तेव्हा मुंबई पोलिसांची एकच खळबळ उडाली. माहितीनुसार मुंबई पोलिसांना दिशाच्या मृत्यूविषयी कोणतेही सत्य बाहेर आणायचे नव्हते. यामुळेच पटणा पोलिसांना दिशा प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे दिली गेली नाहीत. पटणा पोलिसांच्या एसआयटीमध्ये सामील असलेल्या पोलिसांवरही नीट वागणूक दिली गेली नव्हती.

श्रुतीची तब्येत बिघडल्यावर दिशा बनली होती पीए
एसआयटीच्या तपासणीत असेही समोर आले आहे की, श्रुती मोदीची तब्येत बिघडल्याने दिशा सुशांतची पीए बनली होती. दिशाने काहीच दिवस सुशांतचे काम सांभाळले. यानंतर ती परत गेली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like