सुशांतच्या ‘कॅश’वर रिया करायची ‘एैश’, शॉपिंगपासून तिकिट बुकिंगपर्यंत पैसे अभिनेत्याच्या अकाउंटवरून ‘खर्च’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांतच्या पैशांने रिया चक्रवर्तीने अनेक वेळा परदेशी दौरे केले आहेत. रियाने यापूर्वी ऑस्ट्रेलिया, युएई, स्वित्झर्लंड सारख्या विविध देशांना भेट दिली होती. परदेशात खरेदी करण्यापासून तिकिटांपर्यंतही रिया सुशांतच्या खात्यातून पैसे द्यायची. सहा महिन्यांत रिया बर्‍याच वेळा परदेशात गेली. माहितीनुसार केंद्रीय तपास संस्था सुशांतच्या अनेक खात्यांचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे सुशांतच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, सुशांतला माहिती नसलेल्या लोकांच्या खात्यात त्याच्या खात्यातून पैसे जमा केले गेले. आता ते कोण आहेत याचीही चौकशी केली जाईल.

मुंबई पोलिसांच्या प्रत्येक तपासणीवर उद्भवतायेत प्रश्न
दिशा आणि सुशांत यांच्याविषयी मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रत्येक तपासावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे कि, मुंबई पोलिस जाणीवपूर्वक असे दावे करीत आहेत. कारण या प्रकरणात फेरफार व्हावी. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिशा सुशांतची मॅनेजर नव्हती. ती सुशांतच्या कामाच्या संदर्भात केवळ 23 दिवस संपर्कात आली. दिशा कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीत सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती आणि कंपनीने दिलेल्या कामाच्या संदर्भात 1 एप्रिल ते 23 एप्रिल 2020 पर्यंत सुशांतसोबत होती. मुंबई पोलिसांच्या या तपासावर प्रश्नचिन्ह उद्भवत आहे. सुशांत आणि दिशाची चॅटही समोर आली आहे.

दिशाच्या मृत्यूशी नावे जोडल्यामुळे चिंतीत होता सुशांत
दिशाच्या निधनानंतर सुशांत अस्वस्थ झाला होता. त्याला वाटले की, दिशाच्या या प्रकरणात काही लोक त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. दिशाच्या मृत्यूशी आपले नाव जोडले जाईल, असे सुशांतने आपल्या काही परिचितांना सांगितले होते. दिशाच्या मृत्यूच्या प्रकरणाविषयी त्याच्याविषयी निरनिराळ्या गोष्टी बोलल्या जातील आणि तो व्हायरलही होईल यामुळे सुशांत खूप नाराज होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like