8 जूनला रियाने सोडले होते सुशांतचे घर ?, रियाच्या वकिलाचा खुलासा

पोलिसनामा ऑनलाइन : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणात अजूनही काहीच हाती लागलेले नाही. परंतु, प्रकरण अजूनच गुंतागुंतीचे होत चालले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्म्यहत्याप्रकरणात कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी समजल्या जाणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीने यापूर्वी अटक केली होती आणि त्यातून तिला जमीन हि मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण मीतू सिंग आणि प्रियंका सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सुशांत हा मानसिक आजारी होता. मुंबई येथे उपचार घेत होतो. हे माहीत असून देखील त्याच्या कुटूंबीयांनी त्याला औषध देणे सुरूच ठेवले. असा आरोप रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे. तसेच रिया आणि तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सुशांतची बहीण मीतू सिंग आणि प्रियंका सिंग या दोघीनीही डॉक्टरांच्या सल्याशिवाय, परवानगीशिवाय सुशांतच्या औषधांमध्ये बदल केला. हा गुन्हा आहे, असा देखील आरोप केला आहे. या माहितीवरून याबाबत पोलीसांनी एफआयआर दाखल करून घेतला आहे.

रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले, की सुशांतला डॉक्टरांनी आणि रिया चक्रवर्ती यांनी ड्रग्स घेण्याचे थांबवायला सांगितले होते. मात्र, सुशांतने याला विरोध केला. सुशांतच्या इच्छेने रियाने त्याचे ८ जूनला घर सोडले होते.

सुशांतच्या बहिणीविरोधी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका रद्द करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दखल केले.