Riya Kumari | धक्कादायक ! रिया कुमारीची हत्या; पती आणि मुलीसमोर घातल्या गोळ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूमुळे मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली होती. त्यातच आता मनोरंजन विश्वातून अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी (Riya Kumari) ही तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत असताना हि घटना घडली.

काय घडले नेमके?
रिया कुमारी हि तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती. रिया कुमारीचे पती प्रकाश कुमार हे कार चालवत होते. बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बागनान येथील महेश खेडा पुलाजवळ काही चोरांनी लुटमार करण्यासाठी रियाची गाडी थांबवली. यावेळी रियाने लूटमार करणाऱ्या चोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरटयांनी तिच्यावर गोळी झाडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रियाचे पती प्रकाश कुमार यांनी गाडी चालवत पोलीस ठाणे गाठले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.

Advt.

कोण आहे रिया कुमारी?
रिया (Riya Kumari) ही युट्यूबर आहे. तिने वयाच्या 22 व्या वर्षी झारखंड चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रिया तिच्या डान्सचे व्हिडीओ यूट्यूबरवर शेअर करत असते. ‘वह चलचित्र’ या मालिकेत रियाने मुख्य भूमिका साकारली होती. याच मालिकेमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

Web Title :- Riya Kumari | jharkhand actress riya kumari shot dead on highway family in shock know about her

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tunisha Sharma Suicide Case | तुनिषा आत्महत्या प्रकणात पोलीस तपासात झाला खुलासा; ‘आत्महत्यापूर्वी तुनिषा आणि शिझान यांच्यात झाले होते संभाषण’

Urmila Nimbalkar | मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या हॉट फोटोजने वेधले सर्वांचेच लक्ष; फोटोज वायरल

Ajit Pawar | ‘बावनकुळेंच्या त्या वक्तव्यानंतर आमची तर झोपच हरपली’, अजित पवार यांचा मिश्कील टोला