Riya Kumari | रिया कुमारी हत्येप्रकरणात नवा ट्वीस्ट; पतीनेच रचला कट पोलिसांनी व्यक्त केला संशय

पोलीसनामा ऑनलाइन टीम : दोन दिवसांपूर्वी झारखंड येथील लोकप्रिय अभिनेत्री रिया कुमारी (Riya Kumari) हिची हत्या करण्यात आली होती. आता या हत्याप्रकरणी तिच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याला गुरुवारी पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. (Riya Kumari)

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाचा पती प्रकाश कुमार यांनी तिच्या हत्येचा कट रचला होता. रियाच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबांनी तिचा पती प्रकाश सिंह विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकाश रियाला मारहाण आणि मानसिक छळ करायचा आणि तिला जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर झारखंड येथील बागनानच्या पोलिसांनी रियाच्या पतीला ताब्यात घेतले आहे. प्रकाश हा एक सिनेदिग्दर्शक आहे, तर त्यांनी आजवर अनेक जाहिरातींची देखील निर्मिती केली आहे. तर रिया त्याची दुसरी पत्नी होती. या हत्येनंतर रियाच्या मृतदेहाची फॉरेन्सिक चाचणी देखील करण्यात येणार आहे.

 

 

काय आहे नेमके प्रकरण?

रिया कुमारी हि तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती. रिया कुमारीचे (Riya Kumari) पती प्रकाश कुमार हे कार चालवत होते. बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बागनान येथील महेश खेडा पुलाजवळ काही चोरांनी लुटमार करण्यासाठी रियाची गाडी थांबवली. यावेळी रियाने लूटमार करणाऱ्या चोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरटयांनी तिच्यावर गोळी झाडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रियाचे पती प्रकाश कुमार यांनी गाडी चालवत पोलीस ठाणे गाठले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.

 

कोण आहे रिया कुमारी?

रिया ही युट्यूबर आहे. तिने वयाच्या 22 व्या वर्षी झारखंड चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
रिया तिच्या डान्सचे व्हिडीओ यूट्यूबरवर शेअर करत असते. ‘वह चलचित्र’ या मालिकेत रियाने मुख्य भूमिका साकारली होती.
याच मालिकेमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

 

 

Web Title :- Riya Kumari | riya kumari new twist in riya kumari murder case the
police suspect that the husband has hatched a conspiracy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा