#MeToo : पत्रकार प्रिया रमानींवर मानहानीचे आरोप निश्चित

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – #MeToo अंतर्गत माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी महिला पत्रकार प्रिया रमानी यांच्यावर मानहानीचा खटला भरला होता. याबाबत दिल्ली कोर्टाकडून पत्रकार प्रिया रमानी यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पत्रकार प्रिया रमानी त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

#MeToo अंतर्गत पत्रकार प्रिया रमानी यांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर अकबर यांनी रमानी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर आता दिल्ली कोर्टाने रमानी यांच्यावरील आरोप निश्चित केले आहेत. मात्र अतिरिक्‍त मुख्‍य न्‍यायाधिश समर विशाल यांच्‍यासमोर हजर राहिलेल्‍या प्रिया रमानी यांनी आरोपाचे खंडन करत निर्दोष असल्‍याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाच्‍या सुनवाणीला सामोरे जाणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. प्रिया रमानी यांनी अकबर यांच्यावर केलेले आरोप प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते.

२० महिलांनी लावले होते अकबर यांच्यावर आरोप

प्रिया रमानी यांच्यानंतर गजाला वहाब, शुमा राहा, अंजू भारती आणि शुतापा पॉलसह २० महिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यापैकी कोणीही अकबर यांच्या विरोधात तक्रार केलेली नाही.