काश्मीरच्या मुद्यावरून सौदी भारताला घेरण्याच्या तयारीत, ‘पाक’ला जवळ करत उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाने काश्मीर मुद्यावर मुस्लिम देशांची सर्वात मोठी संघटना असलेल्या इस्लामिक सहकार्य संघटनेच्या सदस्यांची बैठक बोलावण्याची योजना बनवली आहे. पाकिस्तानी मीडियातून असा दावा केला जात आहे की सौदी अरबिया काश्मीर मुद्यावर चर्चा करण्यासाठी ओआयसी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बोलावत आहेत.

पाकिस्ताचे वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान सौदी परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सउद यांनी काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्याचा आश्वासन दिले.

प्रिन्स फैसल यांनी गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याबरोबर चर्चा झाली. या बैठकीत पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी, परराष्ट्र सचिव सोहेल महमूद, आयएसआय डायरेक्टर जनरल लेफ्टनंट फैज हमीद आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मुलाखतीनंतर पाकिस्तानबरोबरील नाते राजकीयदृष्या सलोख्याचे असल्याचे सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की सौदी आणि पाकच्या परराष्ट्र मंत्री काश्मीरच्या मुद्यावर ओआयसीच्या भूमिकेसंबंधित चर्चा केली. परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी सौदीच्या परराष्ट्र मंत्री सउद यांच्याबरोबर एनआरसी संंबंधित चर्चा केली. सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की पाकिस्तानच्या महत्वाच्या हितांशी संबंधित मुद्यांवर सौदी समर्थन देईल आणि पाकिस्तानबरोबर असलेल्या प्रत्येक कराराला मजबूत करेल.

सौदीचे प्रिन्स फैसल कुआलालंपूर समिटमध्ये सहभागी न झाल्याने पाकिस्तानचे आभार मानले आणि एकदिवसीय दौऱ्यावर गेले. काही दिवसांपूर्वी मुस्लिम देशांच्या नेतृत्वात सौदी अरब आणि मलेशिया तुर्की पाकिस्तानदरम्यान ओढाताण पाहायला मिळाली.

मलेशियाच्या कुआलालंपूरमध्ये मुस्लिमांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिटचे आयोजन केले गेले होते ज्यात पाकिस्तानचे पंतप्रधान सहभागी होणार होते. परंतु सौदीने याला विरोध केल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या समिटमध्ये जाण्याचे रद्द केले.

पाकिस्तानचे मलेशियाच्या समिटमध्ये सहभागी न होणे त्यांच्या राजकीय धोरणावर परिणाम करणारे आहे. वृत्तानुसार मलेशिया आणि तुर्कीबरोबर मिळून पाकिस्तानच्या पीएमने समिटची रुपरेखा बनवली होती जेणे करुन जगभरातील मुस्लिमांच्या समस्या उपस्थित करता येतील. परंतु सौदीने या समिटला आपल्या नेतृत्वात इस्लामिक सहयोग संघटनेला पर्याय बनविण्याचा प्रयत्न असल्याने आमंत्रण मिळून देखील सहभाग घेण्यास नकार दिला.

मलेशियामध्ये पार पडणाऱ्या या समिटला पाकिस्तानकडून जोरदार समर्थन मिळाला होती कारण मागील काही काळापासून सौदी अरबचे भारताशी संबंध मजबूत झाले होते. सौदीने आणि यूएईने काश्मीर मुद्द्यावर भारताचे समर्थन केले होते. तर मलेशिया आणि तुर्कीने भारताच्या निर्णायाच्या विरोध करत पाकिस्तानला साथ दिली होती.

सौदी आणि यूएईचे भारताबरोबरील संबंध अत्यंत मजबूत आहेत. सौदीची सरकारी तेल कंपनी अरामकोने नुकतीच भारतात अब्जो डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.

काश्मीर मुद्द्यावर सौदीसह अनेक मुस्लिम देशांचे कुटनितीत समर्थन न मिळाल्यास पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले होते की आपण इस्लामचे कितीही बोललो तरी या देशांचे भारताशी आर्थिक हितसंबंध जोडले असल्याने त्यांचे भारताविरोधात समर्थन मिळवणे तितके सोपे नाही.

तज्ज्ञांनी सांगितले की पाकिस्तानमधील आपला प्रभाव कमी झाल्याच्या भीतीने सौदीने आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना इस्लामाबादच्या दौऱ्यावर पाठवले. याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे की काही दिवसांपूर्वी सौदीच्या नेतृत्वात काम करणाऱ्या इस्लामिक सहयोग संघटनेने नागरिकत्व कायद्यासंबंधित काही वक्तव्य केले होते. ओआयसीने भारताला सल्ला दिला होता की नागरिकत्व कायदा आणि बाबरी मस्जिद सारख्या घटनांमध्ये स्थानिक स्तरावर धोका निर्माण होऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/