RJD च्या शिवानंद तिवारींची ‘मास्टर ब्लास्टर’वर टीका, म्हणाले – ‘सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणे भारतरत्नचा अपमान’

पाटणा : वृत्तसंथा –  आज देशात नाहीतर परदेशात सुद्धा ट्विटवरून राजकारणात गदारोळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर भारताचा क्रिकेटपट्टू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्विट केलं होत. त्यावरून राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी टीका केली आहे. शिवानंद तिवारी यांनी भारताचा क्रिकेटपट्टू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिलेल्या भारतरत्न पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केलं होत की, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही.” बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असं
सचिन तेंडुलकरने म्हटलं होत.

दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी म्हणाले की, “त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, परंतु त्यांचं जाहिरातीत काम करणे सुरूच आहे. ते एक मॉडेल आहेत. सचिन तेंडुलकरांसारख्या लोकांना अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले, हा भारतरत्नचा अपमान आहे. असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच आज लोकांनी ट्विटरच्या माध्यमातून राजकारण सुरू केलं आहे. मात्र खेड्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना मायक्रो-ब्लॉगिंग साइट्स किंवा सोशल मीडियाच्या अन्य प्रकारांबद्दल माहिती देखील नाही, असं शिवानंद तिवारी यांनी म्हटलं आहे.