RMD Foundation Blood Donation Camp | रसिकलाल धारीवाल यांचा जन्मदिन रक्तदान शिबीराने साजरा; 561 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – RMD Foundation Blood Donation Camp | रसिकलाल धारीवाल (Rasiklal Dhariwal) यांचा जन्मदिन म्हणजे प्रबळ अस्तित्वाची भावना आणि चैतन्य व सामाजिक कार्यपरंपरा पुढे नेण्यासाठी व सतत कार्यरत राहण्यासाठी नेहमी प्रेरित व प्रवृत्त करतात अशी भावना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आर एम डी फाऊंडेशन (RMD Foundation) द्वारा आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल (Shobha Rasiklal Dhariwal) यांनी व्यक्त केली. (RMD Foundation Blood Donation Camp)

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी ,उदयोग जगतातील मान्यवर,विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी,शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वृत्तप्रतिनिधी , महाविद्यालयीन विद्यार्थी , पोलीस अधिकारी , इत्यादी रक्तदाते रक्तदानास स्वईछेने आले होते. यावेळी 561 रक्तदात्यांनी रक्तदान केले. (RMD Foundation Blood Donation Camp)

2014 साली महारक्तदान सोहळ्याचे आयोजन संपूर्ण राज्यात ओळखल्या गेले एकाच दिवशी पुणे शहरात 24 हजार रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या होत्या अशी आठवण फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) यांनी करून दिली.
यावेळी बालन उद्योग समूह तथा ईंद्राणी बालन फाऊंडेशनचे
(Indrani Balan Foundation) अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) उपस्थित होते .

रक्तदानाच्या व्यतिरिक्त वैद्यकीय , नर्सिंग , लॅबोरेटरी ,फार्मसी क्षेत्रातील शिष्यवृत्ती साठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावर्षीची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची व निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे धनादेश संबंधीत महाविद्यालयास लवकरच पाठविण्यात येईल अशी माहिती शोभाताई यांनी दिली .
आजची बिकट आर्थिक परिस्थिती उद्या नक्कीच बदलते त्यासाठी विद्यार्थ्यांनी कसून मेहनत घ्यावी व आपल्या क्षेत्रात नाव कमवावे असे मार्गदर्शन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा सर्जन डॉ .
रणजीत जगताप यांनी केले.
यावेळी डॉ. भाग्यश्री पाटील ,उपाध्यक्षा, डॉ . डी . वाय .पाटील
इन्स्टिटयूट ऑफ फार्मासिटिकल्स सायन्स अँड रिसर्च पुणे प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित होत्या त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीसाठी फाऊंडेशनचे आभार मानले.
तर प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक यांनी किशोर कुमार यांचे गीत गाऊन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.
सर्व रक्तदात्यांचे शोभा धारीवाल यांनी आभार मानले.

Web Title :- RMD Foundation Blood Donation Camp |
Rasiklal Dhariwal’s birthday celebrated with blood donation camp; 561 blood donors donated blood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी अभियानास सुरुवात, 1 हजार विद्यार्थ्यांना दिली शपथ

Hingoli Crime News | बी.ए.प्रथम वर्षात नापास झाल्याने 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Apla Pune Cyclothon | पुनीत बालन ग्रुप आपलं पुणे सायक्लोथॉन रविवारी (5 मार्च)