RMD Foundation | ‘उवसग्गहरं स्त्रोत्र’ पठण केल्याने सर्व दु:खपिडा दूर होतात – शोभा धारिवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – RMD Foundation | ‘उवसग्गहरं स्त्रोत्र’ (Uvasaggahar stotra) पठणामुळे दृष्टग्रह, रोगपिडा, शस्त्रु आदी सांसारिक दु:खपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. हे मी स्वत: अनुभवले आहे व तुम्हालाही याची प्रचिती येईल असे मत आरएमडी फाऊंडेशनच्या (RMD Foundation) उपाध्यक्षा शोभा आर धारिवाल (Shobha R Dhariwal) यांनी व्यक्त केलं. रसिकलाल माणिकचंद धारिवाल स्थानक भवन बिबवेवाडी (Rasiklal Manikchand Dhariwal Station Bhawan Bibwewadi) येथे आयोजित केलेल्या सामूहिक ‘उवसग्गहरं स्त्रोत्र’ पठण कार्यक्रमात शोभा धारीवाल बोलत होत्या.

 

‘उवसग्गहरं स्त्रोत्र’ आयोजनाचे हे सहावे वर्ष होते. या कार्यक्रमाला पूज्य उपप्रवर्तिनी महासती सुमित्राजी म. सा., प. पू. दिनेश मुनीजी म. सा. प. पू. दिव्यताश्रीजी इत्यादी उपस्थित होते.

 

यावेळी संप्रज्ञाजी महाराज यांनी माणिकचंद ग्रुपचे संस्थापक रसिकलाल एम धारिवाल (Manikchand Group Founder Rasiklal M Dhariwal) यांच्या समाजसेवेतील विविध कार्याचा उलगडा केला. तर आर एम डी फाऊंडेशनच्या (RMD Foundation) अध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन (Janhvi Dhariwal Balan) यांनी तरुण वयातच आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असल्याचे सांगितले. तसेच जानव्ही यांचे पती पुनीत बालन (Puneet Balan) यांनीही त्यांच्या सामाजिक कामात पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या कार्यक्रमाला बिबवेवाडी जैन श्रावक संघाचे (Bibvewadi Jain Shravak Sangh) पोपटशेठ ओसवाल (Popatsheth Oswal)
व सर्व पदाधिकारी, इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation) व बालन ग्रुपचे (Balan Group) अध्यक्ष पुनीत बालन,
समाजातील विविध मान्यवर, उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा आर धारीवाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन माणिक दुगड (Manik Dugad) यांनी केले.

 

Web Title :- RMD Foundation | Recitation of Uvasaggaharam Strotra removes all miseries Shobha Dhariwal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा