हे माझं अपयश ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात होणारे रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी रोखू शकलो नाही हे माझ्या मंत्रालयाचं आणि माझं अपयश आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कबुली दिली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी प्रांजळपणे ही कबुली दिली. यावेळी त्यांनी देशातील नवीन रस्ते योजनांबाबत माहीती दिली.

गडकरी म्हणाले, 12 तासांच्या आत दिल्ली मुंबईचा पल्ला गाठणं शक्य होणार आहे. या महामार्गाचं काम सुरु आहे. मागील 5 वर्षाच्या आमच्या मंत्रालयाने अनेक क्षेत्रात यश मिळवले. पण मागील पाच वर्षात रस्ते दुर्घटना कमी करण्यात अपयश आले. प्रत्येक वर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात. मृतांमध्ये 18-35 वयोगटातील जवळपास 65 टक्के लोक आहेत. नवीन मोटार वाहन कायदा एक वर्षापासून राज्यसभेत अडकला होता, मात्र आता पारित झाला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

देशात 30 टक्के बोगस परवाने
परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे. देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. एक व्यक्ती तीन वेगवेगळ्या शहरांमधील परवाने ठेवतो. त्यासोबत बस ड्रायव्हरला चांगले प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण शाळा उघडण्याची तयारी करत आहोत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून दंडाची रक्कम वाढविली आहे. या भीतीमुळे वाहन चालक रस्त्यावर गाडी चालवताना वाहतूक नियमांचे पालन करेल असे गडकरी यांनी सांगितले.

5 कोटी रोजगार निर्मितीचे ध्येय
पाच कोटी रोजगारनिर्मिती करण्याच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले, आम्ही 40 किलोमीटर प्रतिदिन असं रस्ते बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. आता 32 किमी असं सुरु आहे. यावीर्षी 40 किमी होईल. तसेच 5 कोटी रोजगार निर्मिती करण्याच ध्येय आमचं आहे. नवीन योजनांमधून रोजगारासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. आव्हानात्मक स्थिती असून आम्ही यातून मार्ग काढू असेही गडकरी यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/