राजस्थान : बीकानेरमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू तर 20 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल हायवे 11 वर श्रीडूंगरगढ़च्या जवळ एक प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना आहे. या अपघातात 10 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर 20 हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र मृत्यूच्या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते असे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेच्या वेळी अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडलेले होते आणि या लोकांना वाचवण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागली. अपघात इतका दुर्दैवी होता की, अनेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसने आग पकडल्याने मदत कार्यासाठी जरा उशीर लागला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली त्यानंतर जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासंबंधीच्या हालचालींना वेग आला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like