बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; 10 जण ठार

मुरादाबाद : वृत्तसंस्था – उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्यांवर धुके पसरले आहे. याच धुक्यामुळे बस आणि ट्रक या वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. त्यामुळे मोठा अपघात झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात बसचा अक्षरश: चक्काचूर झाला.

शनिवारी सकाळी एका बसमधून जाणाऱ्या प्रवाशांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस जेव्हा एका ट्रकला धडकली. तेव्हा हा अपघात झाला. ही घटना मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी ठाण्यातील परिसरात हुसैनपूर पुलावरील आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू जाला असून, 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

जखमी रुग्णालयात दाखल
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरु करण्यात आली.

पश्चिम बंगालमध्ये 13 जणांचा मृत्यू
दरम्यान, यापूर्वी 20 जानेवारीला पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीत धुक्यामुळे मोठा अपघात झाला होता. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान, एकावर एक अशा वाहनांची टक्कर झाली. तसेच यामध्ये 18 जण जखमीही झाले होते.

राजस्थानातही झाला मोठा अपघात
राजस्थानच्या टोंक येथे एक भीषण अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या ट्रेलरची जीपला जोरदार धडक बसली. यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यातील 6 जण एकाच कुटुंबातील होते.