home page top 1

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी 2 तासांसाठी रोड ‘ब्लॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बुधवारी (दि.23) दोन तासांसाठी बंद राहणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी हा बंद घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळविण्यात आली आहे. ब्लॉक दरम्यान या मार्गावरील वाहूतूक खालापूर टोलनाक्यापासून पुण्याकडे वळवण्यात येणार आहे.

मंगळवारी दुपारी 12 ते 2 या दरम्यान पुणे लेनवर किमी 82 ठिकाणी ओव्हर हेड ग्रँन्टी बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीतमध्ये द्रुतगती मार्गावरील पुणेकडे जाणारी वाहतुक दोन तासांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्या दरम्यान सर्व प्रकारच्या अजवड व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांनी द्रुतगती मार्गावरील खालापुर टोलनाका व कुसगाव टोलनाक्याच्या अलीकडे थांबवण्यात येणार आहेत.

या मार्गावरून जाणारी हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने ही द्रुतगती मार्गावरील कुसगांव टोलनाका यथून जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन पुण्याकडे वळण्यात येणार आहेत. बुधवारी दुपारी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like