गडचिरोली : नक्षलवाद्यांनी झाडे टाकून अडविला रस्ता

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोलीतील आलापल्ली ते भामरागड या मुख्य रस्त्यावर नक्षलवाद्यांनी झाडे कापून टाकली असून रस्ता अडविला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. पेरमिल्ली ते आलाप्पली दरम्यान पेरमिली पासून २ किमी अंतरावर अरेंदा फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी झाडे कापून ती रस्त्यावर टाकून संपूर्ण रस्ता बंद केला आहे. त्याच्याजवळ त्यांनी एक बॅनर लावले आहेत. तसेच काही पत्रकेही तेथे आढळून आली आहेत.

२ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजीए चा १९ वा वर्धापन दिवस साजरा करणार आहे. तेथील बॅनर त्यांनी म्हटले आहे की, ब्राम्हणवादी आणि दलाल भांडवलदाराकडून देशाला मुक्त करण्यासाठी तरुण -तरुणींनी पीएलजीए त भरती व्हा. जल जंगल जमीन इज्जतला वाचविण्यासाठी सरकारी हल्ल्यांना विरोध करा.

मोदींच्या नविन दडपशाही नीति समाधानाला पराभूत करण्यास पार्टी पीएलजीए, जनता सरकार जन संगठन आणि सर्व जनता संगठीतपणे लडाई ला तीव्र करु कित्येक तुमचा हिम्मत आहे बघितला आणि बघु. दडपशाही कधी जिंकणार नाही़ जनता कधी हरणार नाही़ पेरमिली एरीया कमेटी असे या बॅनरवर लिहिले आहे.

Visit : Policenama.com