Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे भारतातील ट्वेंटी-20 लीग रद्द, मे किंवा ऑक्टोबरमध्ये होणार सामने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ट्वेटी-20 क्रिकेट स्पर्धा करोना व्हायरसमुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोजकांकडून याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. पण याबाबत आयोजकांनी तातडीने बैठक बोलावल्याचे वृत्त आहे. या लीगमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, ब्रेट ली आदी दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहे.

आरोग्य मंत्रालयाने गर्दी टाळण्याचा सल्ला दिला होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचे उर्वरित सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला गेला होता. तसेच पुण्यातील सामने नवी मुंबईच्या डी वाय पाटील येथे हालविले होते.त्यातच आता ही स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याची माहीत समोर येत आहे.

या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर आयोजक ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. या लीगचे उर्वरित सामने मे किंवा ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येतील. पण, खेळाडू कधी उपलब्ध आहेत, त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरण, मार्वन अटापट्टू आणि रंगना हेरथ यांनी भारत सोडला आहे. अन्य परदेशी खेळाडू येत्या दोन दिवसांत मायदेशात परतण्याची शक्यता आहे.