नगरमधील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

नगर : पोलीसनामा ऑनलाईन

काल पासून सुरु झालेलं मराठी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. आज सकाळी नगर मध्ये ‘सकल मराठा समाजाच्या’ वतीने नगर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच शहराबाहेर जाणाऱ्या सर्व महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

[amazon_link asins=’B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98a0e1a2-8fd0-11e8-bb2d-2b552f9c5743′]

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी गेल्यावर्षी सुद्धा मोर्चे निघाले होते. त्याच पार्शवभूमीवर हे आंदोलन होत आहे. आता मुंबई पाठोपाठ नगरही बंद राहणार आहे. मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.आंदोलनादरम्यान कोणही तोडफोड करुन नये असे आवाहन आंदोलन समन्वयकांनी यावेळी केले आहे.