नितीन गडकरी यांनी केलं मान्य ! निवडणुकीमुळे बंगाल-केरळमधील महामार्ग प्रकल्प जाहीर, विचारले – ‘यात काय गैर आहे ?’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टतेसाठी प्रसिद्ध आहेत. कधीकधी ते अशा गोष्टी अगदी सहजतेने बोलून टाकतात, ज्यापासून नेतेमंडळी स्वतःचा बचाव करतात. आत्ताही गडकरी यांनी कबूल केले कि, निवडणुकांमुळे बजेटमध्ये बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि केरळसारख्या मतदारसंघातील महामार्ग प्रकल्प जाहीर करण्यात आले. त्यांनी सहजतेने याचा स्वीकार करत विचारले कि, त्यात गैर काय आहे?

एका मुलाखती दरम्यान त्यांना विचारले गेले की, सर्व रस्ते प्रकल्पांची घोषणा निवडणुकांच्या राज्यांतच का करण्यात आली ? यावर गडकरी म्हणाले, “आम्ही साधू संत आहोत का?” निवडणुकीच्या वेळी प्रत्येक पक्ष आपली विकास कामे कॅश करते. मी मान्य केलंय ना कि निवडणुका आहेत, म्हणून तिथे प्राधान्याने करत आहोत. यात काय गैर आहे, कोणत्या नियम व कायदे किंवा लोकशाहीविरूद्ध आहे? ”

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांसाठी रस्ते प्रकल्पांची घोषणा केली. अर्थमंत्री म्हणाल्या की, केरळमध्ये 6500 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीने 1,100 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधला जाईल. तामिळनाडूमध्ये 1.03 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 3,500 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील. आसाममध्ये 19 हजार कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची घोषणा झाली. पश्चिम बंगालमध्ये 25 हजार कोटी रुपये खर्चून महामार्ग तयार करण्याची घोषणा करण्यात आली.

‘तासात दिल्ली ते देहरादून, तर 3 तासात होणार जयपूरचा प्रवास’
गडकरी म्हणाले की, दिल्ली-मेरठचा प्रवास जूनपर्यंत 40-50 मिनिटांत पूर्ण होईल, त्यानंतर लवकरच दिल्ली ते देहरादून जाण्यासाठी अवघ्या 2 तासांचा कालावधी लागेल. तसेच एका वर्षात दिल्ली-जयपूरचा प्रवास 3 तासात पूर्ण होईल. ते म्हणाले कि, ते जे करतात, ते 100 टक्के पूर्ण करतात. गडकरी म्हणाले की, जेव्हा ते मंत्री बनले 203 प्रकल्प बंद झाले होते, त्यांनी सर्व प्रकल्प सुरू केले आहेत.

‘मीच दिला होता, पेट्रोल आणि डिझेलवर सेसचा विचार’
पेट्रोल डिझेलवर सेस लावण्याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, त्यांनी अटल बिहारी वायपेयी यांच्या आदेशानुसार पंतप्रधान ग्राम सड़क योजना तयार केली होती. जेव्हा यासाठी निधीचा प्रश्न आला तेव्हा मीच पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर 50 पैसे सेस लावण्याविषयी सुचविले होते.